top of page

VIDARBHA ARTHSHASTRA PARISHAD 45VE ADHIVESHAN

Date of event started on

Friday, 25 March, 2022 at 3:00:00 am UTC

Date of event ended on

Saturday, 26 March, 2022 at 10:30:00 am UTC

Venue

Pasaydan Auditorium

Organizers

IQAC &

Department of Economics

Purpose of organizing event

अधिवेशना निमित्त अर्थशास्त्राशी सबंधित जागतिक, राष्ट्रीय व प्रादेशिक विषयावर सखोल चर्चा व मंथन करणे. नामवंत अर्थतज्ञ, प्राध्यापक याचे मार्गदर्शन व मतमतातरे जाणून घेणे. सहभागी प्रतींनिधींचे व विद्यार्थी संशोधकांचे ज्ञान वृद्धीगत करणे व त्यांना नवीन संशोधन करण्याची प्रेरणा निर्माण करणे या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी प्रस्तुत अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले.

Total number of attendees

116

Brief Report

श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव, अर्थशास्त्र विभागाच्या वतीने विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे 45 वे वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. या अधिवेशना निमित्त अर्थशास्त्राशी सबंधित जागतिक, राष्ट्रीय व प्रादेशिक विषयावर सखोल चर्चा व मंथन करणे. नामवंत अर्थतज्ञ, प्राध्यापक याचे मार्गदर्शन व मतमतातरे जाणून घेणे. सहभागी प्रतींनिधींचे व विद्यार्थी संशोधकांचे ज्ञान वृद्धीगत करणे व त्यांना नवीन संशोधन करण्याची प्रेरणा निर्माण करणे या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी प्रस्तुत अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले.


श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव येथे विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे 45 वे अधिवेशन डॉ.विनोद गावंडे पदवीत्तर अर्थशास्त्र विभाग प्रमुख शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली दि. 25 व 26 मार्च 2022 ला आयोजित करण्यात आले. यानिमित्ताने "आंतरराष्ट्रीय व्यापार व प्रादेशिक गटांचा उदय", भारतातील हवामान बदल, परिणाम व उपाय" आणि विदर्भातील राष्ट्रीय पेयजल योजना: जिल्हानिहाय" या विषयांवर सखोल चर्चा व मंथन केले. या अधिवेशनाचे उदघाटना प्रसंगी उद्घघाटक डॉ. मृणालिनी फडणवीस कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, विद्यापीठ सोलापूर, प्रमुख अतिथी डॉ. विनायक देशपांडे, कुलगुरू जी. एच. रायसोनी अभिमत विद्यापीठ, अमरावती, कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद बोरकर, सचिव भारतीय शिक्षण संस्था नवरगाव, परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. निवृत्ती पिस्तूलकर, उपाध्यक्ष डॉ. प्राची देशपांडे, सचिव डॉ. विठ्ठल घिनमिने, डॉ. राजेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. उद्घाटक मार्गदर्शन करताना डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी 'जागतिक बाजारात वाढलेल्या तेलाच्या किमती' यावर विचार व्यक्त केले तर प्रमुख अतिथी डॉ. विनायक देशपांडे, यांनी 'नवीन शैक्षणिक धोरण' या विषयावर सखोल मार्गदर्शन व चर्चा केली. प्रमुख अतिथींच्या हस्ते “आंतरराष्ट्रीय व्यापार व प्रादेशिक गटांचा उदय", “भारतातील हवामान बदल, परिणाम व उपाय" आणि विदर्भातील राष्ट्रीय पेयजल योजना: जिल्हानिहाय" या विषयाशी निगडीत प्राप्त संशोधन लेखांचे ऑनलाइन ‘अर्थनाद’ चे प्रकाशन करण्यात आले.
या सोबतच "प्राध्यापक नानेकर-प्राध्यापक पिंपळकर स्मृती व्याख्यानाच्या" निमित्ताने "महिला सक्षमीकरण" या विषयावर श्रीमती शुभदा देशमुख, संस्थापक सदस्य "आम्ही आमच्या आरोग्यासाठी" कुरखेडा यानी ‘महिला सक्षमीकरण’ व डॉ. उषा पाटील, गो.सा.वी. गावंडे महाविद्यालय उमरखेड यांनी "आर्थिक ग्रंथातील विचार विश्व" या विषयावर मार्गदर्शन मार्गदर्शन केले.
या परिषदेनिमित्त विविध विषयावर 49 संशोधकांनी आपले शोध निबंधाचे वाचन केले. विदर्भातील 12 अर्थशास्त्राचे अभ्यासक व लेखकांनी आपल्या पुस्तकांचे प्रकाशन केले.
या अधिेवेशनाच्या समारोपीय कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रशांत बोकारे यांनी प्रादेशिक समस्यावर चर्चा व सशोधन करण्याचे आवाहन अधिवेशनाला केले. प्रमुख अतिथि प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, व डॉ. प्रकाश तितरे अध्यक्ष, अर्थशास्त्र अभ्यास मंडळ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, व समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत बोरकर अध्यक्ष, भारतीय शिक्षण संस्था नवरगाव हे उपस्थित होते.
या परिषदेला विदर्भातील ख्यातनाम अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, डॉ. दि.व्य. जहागीरदार, डॉ. मुक्ता जहागीरदार, डॉ. आर. वाय. माहोरे, आदी ख्यातनाम अभ्यासक व विदर्भातील नामवंत अर्थतज्ञ, प्राध्यापक तथा संशोधक उपस्थित झाले व त्यांनी आपले सक्रिय सहभाग नोंदविले. या दोन दिवसीय अधिवेशनाच्या यशस्वीतेकरिता भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत बोरकर, सचिव सदानंद बोरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी विशेष योगदान दिले.

Event Outcomes

या अधिवेशना निमित्ताने नामवंत अर्थतज्ञ, प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यात विविध विषयावर चर्चा झाली. यातून सहभागी प्रतींनिधीचे ज्ञान वृद्धीगत झाले, त्यांच्या समस्यांचे निरासन झाले. त्यांना विविध आर्थिक समस्यांची जाणीव झाली. यामुळे नव्या संशोधकांना नव्या प्रश्नांवर संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली

bottom of page