मराठी विभागाच्या वतीने दर वर्षी लेखक आपल्या भेटीला या विशेष उपक्रमात मराठीतील सुप्रसिद्ध कवी लेखकांना बोलावून विद्यार्थ्यांच्यासाठी व्याख्यानाचे आयोजन केले जाते. यावर्षी “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने :कविता निर्मिती प्रक्रिया आणि माझी कविता” या विषयावर घनसावंगी, जिल्हा जालना येथील संत रामदास महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख तसेच मराठीतील सुप्रसिद्ध कवी डॉ. मारुती घुगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी व्याख्यानामध्ये मराठी कवितेची परंपरा तसेच आधुनिक काळातील मराठी ग्रामीण कवितेची वाटचाल अनेक कवितांची उदाहरण देत सुलभपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सोबतच स्वतःमध्ये कविता निर्मितीची प्रेरणा कशी निर्माण झाली याचे सूतोवाच केले. या व्याख्यानात गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयातील काही प्राध्यापक तसेच विद्यार्थी ऑनलाइन गुगल मीटर सहभागी झाले होते. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन मराठी विभागाचे प्रमुख डॉ. गजानन कोर्तलवार यांनी केले. तर या व्याख्यानाचे प्रमुख अतिथी म्हणून तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश बाकरे यांनी आपली जबाबदारी निभावली. अतिशय प्रेरणादायी अशा या कार्यक्रमात एकूण 82 लोक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना मराठी काव्य परंपरा तसेच कविता निर्मिती चे स्वरूप लक्षात येण्यास हे व्याख्यान फलदायी ठरले.