मराठी विभागाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या वैचारिक जडणघडणीसाठी एक असे विशेष व्याख्यानाचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोना निर्बंध असल्यामुळे गूगल मीट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून दयानंद कनकदंडे, पुणे यांचे ‘सध्याचा काळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कनकदंडे यांनी समकालीन विविध प्रश्नांचा मागोवा घेत या प्रश्नावर उपाय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक मांडणी कडे कसे पाहता येईल हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांना दिला. एकूणच देशभर सत्तेच्या राजकारणामुळे सामाजिक काय परिस्थिती उद्भवत आहे हे सूत्र समोर ठेवून त्यांनी राजकीय आणि सामाजिक समस्या या संदर्भाने अनेक उदाहरणे देत समकालीन प्रश्नांवर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार किती महत्त्वाचा उपाय ठरतो ते पटवून दिले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सुरेश बाकरे यांनी अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कनकदंडे यांच्या व्याख्यान आतील अनेक मुद्यांचा मागोवा घेत पाखरे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रस्तुत कार्यक्रमात जवळपास 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे संचालन, आयोजनामागील भूमिका आणि पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ. गजानन कोर्तलवार यांनी विशद केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या दृष्टीने चर्चा झाली. प्रस्तुत कार्यक्रम मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या पाठीमागे विद्यार्थ्यांच्या वैचारिक जडणघडणीचा हेतू होता. अनेक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन या व्याख्यानाचा आस्वाद घेतला.