मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी विभागाच्या वतीने पसायदान सभागृहात “समाज माध्यमे आणि आपला वाचन व्यवहार” या विषयावर इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.ललित उजेडे यांचे विशेष व्याख्यान घेण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश बाकरे हे होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक मराठी विभागाचे प्रमुख डॉ.गजानन कोर्तलवार यांनी केले.या वेळी कु.साक्षी चुनारकर या विद्यार्थिनीने आपली स्वलिखित कविता सादर केली.संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन अतुल बारेकर या बी.ए.तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याने केले.
या व्याख्यानात बोलताना डॉ.उजेडे यांनी या काळात आपला वाचन व्यवहार कसा मंदावतो आहे हे पटवून दिले.लेखन आणि वाचन हे आपल्याला कसे घडवते हे त्यांनी अनेक ग्रंथाची उदहारणे देऊन सांगितली. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.बाकरे यांनी दिवसेंदिवस वाचन आणि लेखनाचा कस कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली.कार्यक्रमाचे आभार कु.पर्वते या विद्यार्थीनिनीने मानले.