मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाराष्ट्र शासन आणि गोंडवाना विद्यापीठाने विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या संदर्भात निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या मराठी विभागाने एका विशेष व्याख्यानाचे आयोजन दिनांक 27 1 2022 रोजी दुपारी ठीक 11 ते 12 यादरम्यान केले होते. या विशेष व्याख्यान “बोली भाषेचे संवर्धन व लोकसाहित्य अनुबंध “या विषयावर डॉक्टर बाळकृष्ण लळीत हे पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळातील सदस्य तसेच भाषा व बोलीचे अभ्यासक यांनी अभ्यासपूर्ण व्याख्याने दिले. या व्याख्यानातून त्यांनी मालवणी बोली च्या व लोकसाहित्याच्या अनुषंगाने केलेल्या संशोधनाचे अनेक दाखले देऊन विद्यार्थ्यांना मालवणी लोकगीते गाउन दाखविले. प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश बाकरे होते. भाकरे सरांनी मराठी विभागाच्या विविध उपक्रमशील कार्यक्रमांचा उल्लेख करून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा च्या निमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानाला शुभेच्छा दिल्या. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. गजानन कोर्तलवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विविध शिक्षक व विद्यार्थी मिळून 30 लोक गुगल मीटवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी काही प्रश्नोत्तरे केली. प्रस्तुत व्याख्यानाचे संपूर्ण रेकॉर्डिंग करण्यात आले.