श्री ज्ञानेश महाविद्यलयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्ताने ” मी कविता जगतो….” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रमात मराठवाड्यातील सुप्रसिद्ध कवी नारायण खरात यांनी आपल्या स्वनिर्मित विविध भावना व अनुभवांना कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्त केलेल्या विविध कवितांचे गाऊन सादरीकरण केले.या वेळी त्यांनी लावणी, अभंग, लोकगीत, मुक्तछंद अशा विविध रचना प्रकारातील कविता सादर केल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ज्ञानेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश बाकरे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉक्टर गजानन कोर्तलवार यांनी केले. कवींची ओळख इंग्रजी विभागातील सहायक प्राध्यापक दुर्गेश क्षीरसागर यांनी करून दिली. महाविद्यालयातील जवळपास 37 लोक कार्यक्रमात सहभागी झाले होते.विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सलग सव्वा तास चाललेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कमला नेहरू महाविद्यालायाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.देवेंद्र मनगटे, गोंडवाना विद्यापीठातील वडसा येथील आदर्रश महाविद्यालायातील प्रा.रमेश धोटे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालायातील मराठी विभाग प्रमुख डॉ. मारुती घुगे हे सन्माननीय काव्यरसिक सहभागी झाले होते.
कवी नारायण खरात यांनी कोरोना काळात वारकर्यांच्या मनातील विठ्ठल भेटीची आर्त भावना, मुलगी वयात आल्यानंतर आईच्या मनातील तिच्या आयुष्याविषयीची भीती, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आयुष्यातील नासधूस झालेल्या शेतीचे वर्णन, लावणीतील शृंगार ताल, लय, सूर आणि विविध चालीतून कवितांचे सादरीकरण करून मराठीतील लावणी, अभंग, लोकगीत व मुक्तछंदातील विविध कविता सादर करून त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार मराठी विभाग प्रमुख डॉक्टर गजानन कोर्तलवार यांनी मानले.