प्रस्तुत “लेखक आपल्या भेटीला” या कार्यक्रमात दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील फ्रेंच तत्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ.शरद बाविस्कर यांचा मराठीत अलीकडे म्हणजे २०२१ ला प्रकाशित “भुरा” आत्मकथनाच्या चार आवृत्त्या आल्याने आणि महाराष्ट्रात साहित्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणत हा ग्रंथ वाचल्या जात असल्याने आमच्या विद्यार्थ्यांच्या मनात प्रस्तुत भुरा हे आत्मकथन वाचून डॉ.शरद बाविस्कर यांच्या ग्रंथाशी संबंधित काही प्रश्नावर चर्चा होणे गरजेचे होते.त्या अनुशंगाने श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या पसायदान या सभागृहात दि.३१.०३.२०२२ रोजी बाविस्कर यांच्या विदर्भ दौऱ्याचे औचित्य साधून ” लेखक आपल्या भेटीला” या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे हे होते.या वेळी भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत बोरकर हे उपस्थित होते.तर सचिव सदानंद बोरकर यांनी बाविसकरांचे सत्कार केले.या नंतर त्यांनी भुराच्या निर्मिती प्रक्रीये संदर्भात विस्तृत माहिती देत समकालीन सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय अंगाने तपशीलवार प्रकाश टाकला.