महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार, जोहारर्कर्ते श्री. सुशील धसकटे हे दि. ०४/०३/२०२३ रोज शुक्रवारला ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते. त्यांनी आपल्या शांत संयमी स्वभावानुरूप विध्यार्थ्यांना समजेल, रुचेल, पचेल अशा सोप्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती प्रक्रियेवर विध्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे स्वरूप हे मुक्तसंवादी होते. त्यामध्ये विध्यार्थ्यानी साहित्याशी संबंधित विविध प्रश्न विचारून लेखकांना बोलत केलं. यामुळे हा विशेष कार्यक्रम नुसता कार्यक्रम न राहता एका उत्फूर्त चर्चासत्राच स्वरूप त्याला प्राप्त झालेलं होत. सर्वप्रथम लेखकांनी त्यांच्या स्वः परिचयापासून सुरवात करून स्वः लिखित ‘जोहार’ कादंबरी लेखनाचा प्रवास विध्यार्थ्यांसमोर मांडला. यानंतर विध्यार्थ्यानी आपले प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यामध्ये ‘सर, साहित्याच्या विविध प्रकारांची माहिती देऊन त्यामध्ये कादंबरी नेमकी लिहायची कशी? याबद्दल सांगा.’ या प्रश्नापासून सुरुवात झाली. या प्रश्नाच्या उत्तरादखल सरांनी अगदी सोप्या भाषेमध्ये विविध साहित्य प्रकारांची ओळख करून देऊन त्या साहित्यप्रकारातील मुलभूत संकल्पनांना हात घालत. साहित्य म्हणजे काय? साहित्य नेमक असते तरी काय? कादंबरी म्हणजे नेमक काय? येथपासून सुरवात करून कादंबरीचा विषय, कादंबरी लेखनातील विविध टप्पे याविषयीची विध्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. पुढे याच प्रश्नाला धरून साहित्य निर्मिती प्रक्रियेचे सूत्र आणि त्यामधील अतरंग सरांनी उलगडून दाखविले. यानंतर विध्यार्थ्यानी संपूर्ण कार्यक्रमात अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांमध्येच सरांनी साहित्य निर्मिती प्रक्रियेचा प्रवास आणि त्यामध्ये येणारे विविध अडथळे याविषयीची माहिती दिली. एक ‘लेखक’ लेखक म्हणून जीवन कस जगतो. येथपासून ते साहित्यलेखन करतांना त्या त्या साहित्य प्रकारांच्या लेखनाचे स्वरूप आणि त्यातील मर्यादा विध्यार्थ्यांना सांगितल्या. अशाप्रकारे विध्यार्थी आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कादंबरीकार, जोहार्कर्ते श्री. सुशील धसकटे सर यांच्यामध्ये मुक्तसंवाद झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविध्यालायाचे प्राचार्य श्री. सुरेश बाकरे सर उपस्थित होते. कार्यक्रमच सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. गजानन कोर्तलवार यांनी केलं तसेच आभार प्रदर्शन प्रा. वैभव म्हस्के (सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग) यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.