प्रा जगदीश गायकवाड कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक होते,त्यांनी आपल्या भाषणांतून वेळेचे नियोजन करणे, हस्ताक्षर व्यवस्थित काढने,शिक्षक शिकवित असलेल्या भागाचे स्मरण व्हावे याकरिता टिपण काढणे, मानसिक तणाव कमी करून सामान्य राहण्याचा प्रयत्न करणे, इत्यादी मुद्यांवर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे समनवयक व अध्यक्ष प्रा विजय वाकोडे यानी कार्यशील बनणे ,एकाग्रता ,विषयांशी सांगड घालणे,चिंतन मणन करणे,सकारात्मक दृष्टीकोन बाळगणे या मुद्याला अनुसरून आपले विचार व्यक्त केले, प्रस्थविक व संचालन प्रा ममिडवार यांनी केले,तर आभार प्रदर्शन प्रा सुभाष बोरकर यांनी केले .