आयुष्याला आकार देणारे तसेच आपली बौद्धिक उंची वाढवणारे प्रत्येकानी आवर्जून सहभागी व्हावे असे प्रेरणादायी व्याख्यान.*नितीआयोग भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशनुसार वाचनदिनानिमित्त आयोजित करण्यात आले.श्री ज्ञानेश महाविद्यालय नावरगाव*,जिल्हा चंद्रपूर.मराठी विभागाच्या वतीने आयोजित विषेश व्याख्यानाचा विस्तृत अहवाल.
*”ग्रंथांनी घडणारी माणसं”*
*सुप्रसिद्ध लेखक व कादंबरीकार*
*मा.सुशील धसकटे*
प्रकाशक,हर्मीस प्रकाशन, पुणे
शुभेच्छा –
सुप्रसिद्ध नाटककार
*मा.सदानंद बोरकर*
सचिव, भारतीय शिक्षण संस्था, नवरगाव
*मा.प्राचार्य डॉ.सुरेश बाकरे*
श्री ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव
*समन्वयक*
*डॉ गजानन कोर्तलवार*
(मराठी विभागप्रमुख, श्री ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव, जिल्हा चंद्रपूर)
*दिनांक-19/06/2021*
*शनिवार ,दुपारी 12 वाजत*
ग्रंथांनी घडणारी माणसं- या विषयावरील व्याख्यानात सुरुवातीला मराठी विभागाचे प्रमुख डॉ.गजानन कोर्तलवार यांनी या व्याख्यानाच्या आयोजनामागची भूमिका विशद करून सहभागी पाहुण्यांचा विस्तृत परिचय करून दिला. या व्याख्यानासाठी गूगल मिट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून महाविद्यालयातील विविध शाखेचे विद्यार्थी तसेच गोंडवाना विद्यापीठातील मराठीचे विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील काही सन्माननीय लोक सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय शिक्षण संस्थेचे सचिव माननीय सदानंद बोरकर हे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी आपल्या नाट्यलेखनाच्या साधनेचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. मराठीतील जोहार या कादंबरीचे सुप्रसिद्ध लेखक सुशील धसकटे पुण्यावरून श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमांत सहभागी झाल्याने त्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. तसेच कधीतरी महाविद्यालयात ऑफलाईन व्याख्यानात सहभागी होण्यासाठी व महाविद्यालयास प्रत्यक्षात भेट देण्यासाठी निमंत्रित केले. यासाठी त्यांनी व्याख्यानाचे सन्माननीय पाहुणे सुशील धसकटे यांचे मनःपूर्वक स्वागत त्यांनी केले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश बाकरे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून मराठी विभागाचे कौतुक केले. केंद्र सरकारच्या निती आयोगाकडून प्राप्त निर्देशानुसार वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने असे उपक्रम राबविले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेताना अधिकधिक वाचनाची गोडी लागावी असे उपक्रम राबविले पाहिजे असे यावेळी सन्माननीय प्राचार्यांनी आपले मत व्यक्त केले.
*दिनांक-19/06/2021*
*शनिवार ,दुपारी 12 वाजत*
ग्रंथांनी घडणारी माणसं
https://youtu.be/cdIH1PFs-LY