श्री ज्ञानेश महाविद्यालया सत्र 2014 15 पासून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या मुलींच्या वस्तीगृहाची सुरुवात झाली. दरवर्षी या वसतीगृहात निवासी राहत असलेल्या मुलींच्या अडीअडचणी तसेच त्यांच्या समस्येवर उपाय योजनासाठी वार्षिक बैठकीचे आयोजन केले जाते. या बैठकीत मुलींच्या वस्तीग्रह समितीचे अध्यक्ष तसेच सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य आणि भोजनालया चे संचालक सर्व विद्यार्थिनी उपस्थित राहतात. यावर्षी दिनांक 10- 12- 2021 रोज सायंकाळी 6.30 वाजता मुलींच्या वसतिगृहात वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत सुरुवातीला बैठकीमागचा हेतू विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. डॉ. गजानन
कोरतलवार यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे व मुलींच्या वस्तीगृहाच्या समितीचे प्रमुख डॉ. वासंती रेवतकर यांचा परिचय करून देण्यात आला.सर्व विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे प्राचार्य आणि वसतिगृह समितीचे प्रमुख यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालय शैक्षणिक माहिती, वस्तीगृहाची नियमावली यांचा परिचय करून देण्यात आला.नव गावच्या समृद्ध शैक्षणिक व सांस्कृतिक पर्यावरणाची ओळख करून दिल्यानंतर मुलींना त्यांच्या शैक्षणिक कालखंडात नैतिक जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.जब सर्व निवासी विद्यार्थिनींचा परिचय तसेच त्या राहत असलेल्या विविध रूममधील समस्या आणि त्यांची उपाययोजना या संदर्भात चर्चा झाली. पुढील शैक्षणिक वर्षासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
वार्षिक बैठकी मागील हेतू-
- विद्यार्थिनींचा परिचय घेणे.
- महाविद्यालय आणि वस्तीगृहाच्या नियमावली सांगणे.
- विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेणे, व त्या अंगाने उपाय योजना करणे.
- वसतिगृहाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे.