दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संत ज्ञानेश्वर संजिवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. मराठी विभागाच्या वतीने दरवर्षी या विषयातील तज्ञ अभ्यासकाला व्याख्यानासाठी निमंत्रित केले जाते. यावर्षी अंबड जिल्हा जालना येथील डॉक्टर पुरुषोत्तम जुने यांना या व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले. या व्याख्यान सोहळ्याचे अध्यक्षस्थान भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत बोरकर यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश बाकरे सर हे उपस्थित होते. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी गूगल मीट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्याख्यान ऐकण्यासाठी जॉईन झालेले होते. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील तत्वज्ञानाचे समकालीन औचित्य या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण अशी व्याख्यान यानिमित्ताने जुने यांनी दिले. समकालीन अनेक संदर्भ तसेच तत्वज्ञानाचे स्वरूप आणि पसायदानाचा महत्त्व या व्याख्यानात त्यांनी विशद केले.दिनांक 5 डिसेंबर 2021 रोजी दुपारी बारा वाजता या व्याख्यानाचे आयोजन झालेले होते. ठीक बारा वाजता व्याख्यानाची सुरुवात झाली आणि प्रश्नोत्तरं ती दीड वाजता हे व्याख्यान संपले. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील तज्ञ अभ्यासक विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचीही या व्याख्यानाच्या निमित्ताने उपस्थिती होती.
व्याख्यानाची लिंक : https://youtu.be/INOXIvmHUBM