top of page
body  head strip backg.jpg

स्पर्धा परीक्षेचे मराठी व्याकरण व उपयोजित मराठी

Course designed and developed by the department of

मराठी

Course co-ordinator

Dr Gajanan S Kortalwar

अभ्यासक्रम बद्दल माहिती
 

श्री ज्ञानेश महाविद्यालयात सत्र २०२० - २१ साठी कला व विज्ञान शाखेत प्रवेशित पदवीच्या कोणत्याही सत्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रस्तुत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. प्रथम प्रवेश घेणाऱ्या ६० विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येते .सध्याच्या काळात मराठी व्याकरण व उपयोजित मराठी या विषयाचे महत्व खूप वाढलेले आहे. स्पर्धापरीक्षा कोणतीही असेल मराठी व्याकरणावर विशेष भर असतोच.काही निश्चित गुणांसाठी व्याकरणातील घटक स्पर्धापारीक्षेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असतात.परंतु विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात हे घटक समाविष्ट नाही असे दिसते. म्हणून या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात स्पर्धापरीक्षेच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. तसेच अलीकडच्या विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता कमी होताना आढळते आहे. त्यामुळे सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनां मौखिक व लिखित भाषिक व्यवहार सुलभपणे व आत्मविश्वासपूर्ण करता यावा, त्यांची भाषिक क्षमता विकसित व्हावी या करिता “स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरण व उपयोजित मराठी” या विषयाचा प्रस्तुत तीन महिन्यांचा (बारा आठवडे ) प्रमाणपत्र अभ्यासक्रम आखण्यात आलेला आहे.

अभ्यासक्रम कालावधी आणि पात्रता
 
  • कालावधी : १२ आठवडे.

  • पात्रता : सर्व कला व विज्ञान पदवी शाखेचे विद्यार्थी या प्रमाणपत्र अभ्यासक्रमला प्रवेश घेऊ शकतात.

Yearwise Stats
 


Annual Reports
 

  • 2021-22

  • 2020-21

bottom of page