अंतराळामध्ये वेगवेगळ्या खगोलीय घटना घडत असतात. त्या खगोलीय घटनांचा पृथ्वीवर चांगले आणि वाईट परिणाम होत असतात. अशा घटनांपैकी एक घटना म्हणजे लघुग्रह (Asteroid) पृथ्वीच्या कक्षे जवळून जाणे किंवा पृथ्वीवर येऊन आदळणे. लघुग्रह जर पृथ्वीवर येऊन आदळला आणि तो निर्जन ठिकाणी जर पडला तर नुकसान होणार नाही. पण मानव वस्तीच्या ठिकाणी पडला तर मानव जातीची मोठी हानी होऊ शकते.
जवळपास सहा करोड वर्षा आधी पृथ्वीवर डायनासोरचे वास्तव्य होतं, हे आपल्याला त्यांच्या सापडलेल्या सांगड्यावरून माहिती आहे. अशा प्रकारची एक घटना, सव्वा सहा करोड वर्षाच्या आधी घडली होती. ज्यामध्ये लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळला होता. या घटनेमुळे डायनासोरचा वंश पूर्णपणे नष्ट झाला होता. फक्त उडणारे डायनासोर आणि स्तनधारी जीव जे जमिनीच्या आत म्हणजे गुफांमध्ये राहत होते, ते वाचले होते. अशा प्रकारच्या घटना भविष्यामध्ये सुद्धा होऊ शकतात. ज्यामध्ये डायनासोरप्रमाणे मानव जात पूर्णपणे नष्ट होऊ शकते.
अशा प्रकारच्या घटनांमुळे संपूर्ण मानव जात (जीवसृष्टी) नष्ट होऊ नये म्हणून वैज्ञानिकांचे संशोधन सुरू आहे. भविष्यामध्ये एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येणार असेल तर त्याचा मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने कशा पद्धतीने वळविता येईल किंवा अवकाशातच नष्ट करता येईल. या पद्धतीला Kinetic Impact Method म्हणतात. या पद्धतीत ऍस्टरॉइडला त्याच्या अक्षामधून सरकवल्या जाते. नासा ने याच्यावर आधारित मोठा प्रयोग Mission DART (Double Asteroid Redirection Test) जी जगातील पहिली ग्रह संरक्षण चाचणी, काही वर्षाच्या आधी सुरू केला होती, ती दिनांक 27 सप्टेंबर 2022 रात्री 3.30 वाजता पूर्णत्वास येणार आहे. रोबोट कार सारखा अंतरिक्षयान लघुग्रहाला धडक देणार आहे. त्याचे जिवंत प्रक्षेपण नासाच्या यूट्यूब चैनल वर दाखविण्यात येणार आहे.
प्रयोग कसा आहे?
या प्रयोगामध्ये रोबोट कार सारख्या आकाराच्या एक अंतरिक्ष यान बनविण्यात आलेला आहे. याचे वजन 572 किलोग्रॅम आहे. याला बनवायला 2681करोड रुपये खर्च आला. या यानामध्ये वेगळ्या पद्धतीच्या इंधन उपयोगात आणलेला आहे. तसेच याच्यामध्ये कॅमेरे सुद्धा लावलेले आहेत. या अंतरिक्षयाणामध्ये Impactor आणि Observer राहणार आहे. दोघांमध्ये फोटो तसेच माहिती संकलन करण्याची सुविधा आहे. हा यान जेव्हा asteroid जवळ पोहोचेल तेव्हा Impactor आणि observer, Robotic Auto Guided System द्वारे वेगळे होणार. Impactor हा Demorphosनावाच्या ऍस्टरॉइडला टक्कर देणार जो पृथ्वीपासून 10.8 मिलियन किलोमीटर दूर आहे. त्याच्याजवळ असलेला Didymos नावाच्या ऍस्टरॉइड चा मार्ग बदलण्याची सुद्धा शक्यता आहे. Impactor मध्ये असलेले कॅमेरे त्या क्षणाचे म्हणजे जेव्हा टक्कर होईल त्यावेळी वेळचे फोटो आणि माहिती संकलन करणार आहे. त्याचवेळी observer सुद्धा त्या इम्पॅक्टरचे फोटो आणि माहिती संकलन करून नासाच्या लॅबोरेटरी मध्ये पाठवणार आहेत.
टक्कर च्या वेळी अंतरिक्षयानाचा वेग ताशी 23000 प्रती किलोमीटर राहील. टक्कर झाल्यानंतर त्याच्यावर काय परिणाम होईल हे नंतरच माहीत होणार आहे म्हणजे त्याची दिशा बदलेल की तो नष्ट होईल की आणखी काही याबद्दल वैज्ञानिकांमध्ये व सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
माहिती संकलन:
प्रा. हेमंतकुमार भिमराव मेश्राम
भौतिकशास्त्र विभाग प्रमुख
श्री ज्ञानेश् महाविद्यालय नवरगाव
ता. सिंदेवाहि जिल्हा. चंद्रपूर
स्त्रोत: नासाची वेबसाईट आणि दिनांक 25.09.2022, एबीपी न्यूज लाईव्ह चॅनेल वरची बातमी