काल परवाच्या न्यूज चॅनल मध्ये बातमी होती की सूर्यामध्ये पृथ्वी सामावून नष्ट होणार. परंतु प्रश्न निर्माण होतो, असं कां बरं होणार? सृष्टीचा नियम आहे की ज्याच्या जन्म झाला, त्याचा मृत्यू सुद्धा अटळ आहे. (ज्याची उत्पत्ती झाली तो नष्ट सुद्धा होणार.) फक्त एवढेच की कोणी अब्ज वर्ष जगणार तर कोणी काही मिनिटे, काही तास जगणार. उदाहरणादाखल मे फ्लाय मादी चोवीस तासापर्यंत, फायर फ्लाय दोन महिन्यापर्यंत, बेडूक सहा वर्षे, वटवाघूळ पंधरा वर्षे, कुत्रा वीस वर्षे, कबूतर पस्तीस वर्षे, मनुष्य सत्तर वर्षे, गालपेजेस टॉरटाईज शंभर वर्षे, ग्रीनलँड शार्क दोनशे बाहत्तर वर्षे, ट्यूबवर्म तीनशे वर्षे, ओशन क्वाहोग क्लाम पाचशे वर्षे, ग्लास स्पोंगे दहा हजार वर्षे, सर्व ग्रह एक ते चौपन बिलियन वर्षे, आपली पृथ्वी नऊ बिलियन वर्षे, सूर्य दहा बिलियन वर्षे इत्यादी. सध्या आपल्या पृथ्वी आणि सूर्याच्या जीवनाचा अर्धा कार्यकाळ संपलेला आहे म्हणजेच पृथ्वी आणखी 4.5 बिलियन वर्ष आणि सूर्य 5 बिलियन वर्ष राहणार आहे. यादरम्यान खूप काही भौगोलिक खगोलीय घटना घडणार आहेत. त्यापैकी वैज्ञानिकांनी सांगितलेली एक घटना म्हणजे सूर्याच्या आकार आता आहे त्या आकारापेक्षा 200 पटीने वाढणार आहे. (सध्या सूर्याचा आकार हा आपल्या पृथ्वीच्या 109 पट आहे.) म्हणजेच सूर्याचा आकार वाढून तो पृथ्वीच्या जवळ येईल. यामुळे पृथ्वीवर सूर्याची पोहोचणारी सूर्य किरणे खूप प्रखर असणार. प्रचंड गर्मीमुळे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या खगोलीय घटनेमुळे जे ग्रह थंड आणि सूर्यापासून दूर आहेत, तिथे तापमान वाढण्याची शक्यता आहे. तिथला तापमान जर वाढला आणि तो सजीवसृष्टीला पोषक ठरला तर त्या ग्रहांवर नवीन जीवसृष्टी निर्माण होण्याची शक्यता आहे. जसे मार्स, जुपिटर आणि त्या पुढचे ग्रह इथे सध्या सजीव सृष्टी नाही. परंतु या दरम्यान वैज्ञानिकांच्या उच्च दर्जाच्या संशोधनामुळे परग्रहावर जिथे सजीवांना पोषक असा वातावरण राहील तिथे जाऊन राहण्याची सोय वैज्ञानिकांद्वारे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व घटना या चार ते पाच बिलियन वर्षानंतर घडणार आहेत त्यामुळे सध्या आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. तेव्हाची टेक्नॉलॉजी एवढी प्रगत असणार की या अशा पद्धतीच्या भौगोलिक घटनांपासून वैज्ञानिक जीवसृष्टीच्या संरक्षण करू शकणार.
प्रा. हेमंकुमार भीमराव मेश्राम
पदार्थविज्ञान विभागप्रमुख
श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव
ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर
मो. 8806471670