Saturday, March 5th, 2022

Gondwana University Sports Festival

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत प्रथम अमृत क्रीडा व कला महोत्सवात श्री ज्ञानेश महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नाटिका स्पर्धेत भाग घेऊन प्रथम स्थान पटकाविले. महोत्सवात श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कबड्डी क्रिकेट वॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, एकल गीत आणि नाटिका या स्पर्धांमध्ये भाग घेतला नाटिका स्पर्धांमध्ये लोकनाट्य पांगुळ सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. यात हूमेश काशिवार, ज्ञानेश्वर बोरकर, राजीव पंचवटे, अविनाश गुरुनुले, दीलखुश खोब्रागडे, बदावत, कुंभरे, लेंझे, टॉटवार, बुटले, कामळी, बहादुरे, पानघंटीवार, खोबरे यांचा सहभाग होता. या संचाला कुलगुरू डॉ बोकारे, कुलसचिव डॉ चिताळे, प्र-कुलगुरू डॉ श्रीराम कावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले. या यशाकरिता भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत बोरकर, सचिव सदानंद बोरकर, प्राचार्य डॉ सुरेश बाकरे तसेच कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

Reach us @

Shri Dnyanesh Mahavidyalaya, Nawargaon,

Chimur Road, Sub-Distt – Sindewahi, Distt – Chandrapur, PIN – 441223 (M. S.)

Locate us

Our contacts

Office Hours

Monday to Friday

10:00 am – 05:00 pm

Saturday

07:30 am – 11:30 pm