श्री ज्ञानेश महाविद्यालयात पदवी पातळीवरील कला शाखेची सुरुवात सन 1968 मध्ये झाली. तेंव्हा पासून महाविद्यालयात मराठी विभाग कार्यरत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होण्याआधी पदवीच्या तीन वर्षात मराठी अनिवार्य आणि मराठी साहित्य अशा अभ्यास पत्रिकांचे मराठी विभागाच्या वतीने अध्यापन केले जात असे. सन २०२४ -२५ पासून गोंडवाना विद्यापीठाच्या निर्देशाप्रमाणे प्रथम वर्षासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम लागू करण्यात आलेले आहे.
मराठी विभागाच्या वतीने नियमित अभ्यासक्रमासोबत विविध उपक्रम राबवून या परिसरातील संस्कृती, बोली लोककला याविषयी आस्था बाळगत विद्यार्थ्यांमध्ये संशोधन जाणिवा रुजवण्याचा विशेष प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांच्या साहित्य विषयक जाणिवा अधिक समृद्ध व्हावे म्हणून वर्षभर मराठी विभागाच्या वतीने वाड्ःमय मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाते. सन 2017 पासून ‘आमची भाषा आमची पुस्तक’ हा विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कार रुजवणारा उपक्रम नियमित सुरू आहे. दरवर्षी वीस ते पंचवीस विद्यार्थी नियमित वाचन करणारे या उपक्रमाशी जोडले जातात.
मागील दहा वर्षापासून दरवर्षी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन केले जाते. दरवर्षी शासन निर्देशाप्रमाणे मराठी भाषा गौरव दिन आणि वाचन प्रेरणा दिन या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत मराठीतील लिहित्या हातांना बोलावून विद्यार्थ्यांवर सर्जनशील संस्कार करण्याचा प्रयत्न दरवर्षी केला जातो. मराठी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन चाचणी नुसार प्रकल्प लेखन म्हणून या परिसरातील बोली, लोकसाहित्य, नाटक आणि संस्कृती या विषयाच्या जाणीवा निर्माण होईल हे लक्षात घेऊन विविधांगी विषय दिले जातात. मराठी विभागाच्या वतीने ‘आमची भाषा,आमचे पुस्तक’ हा ग्रंथालय चळवळीचा उपक्रम सत्र 2017 -18 पासून नियमित राबविण्यात येतो. या उपक्रमातून नियमित वाचन करणारे विद्यार्थी यांना महत्वाच्या साहित्यकृती वाचायला मिळते. दरवर्षी १० ते २० नवे नवे विद्यार्थी वाचक निर्माण होतात. ‘स्पर्धा परीक्षेचे मराठी व्याकरण व उपयोजित मराठी’ हा 12 आठवड्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सत्र 2019-20 ते 2020-21 पासून मराठी विभागात सुरू करण्यात आलेला होता. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा व व्याकरणाच्या अडचणी सोडविण्याचा हेतू होता. काही कारणास्तव आज हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम बंद आहे. तरी पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत अभ्यासक्रमांसोबत झाडीपट्टीचे वेगळेपण लक्षात घेऊन नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याचे मराठी विभागाचे प्रयत्न राहील.