गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन विद्यापीठातील विविध महाविद्यालयांमध्ये सुरू होत्या. या अंतर्गत क्रिकेट स्पर्धांचे (मुले) आयोजन तळोधी (बाळापूर) येथील श्री भगवान श्रीकृष्ण महाविद्यालय यांनी केले होते. संपूर्ण गोंडवाना विद्यापीठातून 12 विविध चमुंनी त्यात सहभाग घेतला होता. अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये ज्ञानेश महाविद्यालयाने द्वितीय स्थान मिळवून यशाची मोहर उमटवली. विशेष म्हणजे क्रिकेट या खेळाच्या स्पर्धेत प्रथमच महाविद्यालयाने हा मान पटकावला.