गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ( मुले ) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नवरगाव येथील श्री.ज्ञानेश महाविद्यालय पटांगणावर आयोजीत करण्यात आले होते . श्री ज्ञानेश महाविद्यालय ची २०१४ पासुन आयोजन ची परपंरा कायम ठेवत २०२३ शैक्षणिक सत्रात क्रिकेट स्पर्धचे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालय चे प्राचार्य डाॅ.सुरेश बाकरे यांचे हस्ते करण्यात आले . याप्रसंगी महाविद्यालय चे अधीक्षक हुमेश काशीवार, आयोजक डाॅ.मनोज अरमरकर , महाविद्यालयचे माजी विद्याथीॅ प्रणय उईके व अभिजीत संघेल उपस्थीत होते . २६ ते २८ डिंसेबर या तीन दिवस चाललेल्या स्पधैत गोंडवाना विद्यापिठ अंतर्गत येत असलेल्या एकुन अकरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या टीमने सहभाग घेतला होता . यात प्रथम पुरस्कार श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव यांनी पटकावला , द्वितीय स्थान राष्ट्रपीता महात्मा गांधी महाविद्यालय सावली व तृतीय स्थान सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर यांनी पटकावला . समारोपीय कार्यक्रम महाविद्यालयचे प्राचार्य सुरेश बाकरे यांच्या हस्ते विजेत्या महाविद्यालयीन संघाला शील्ड देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम चे संचालन डाॅ. दिनेश काथोटे यांनी केले तर आभार प्रा . डाॅ.आस्तिक मुनमोडे मानले . यशस्वीतेसाठी राजीव पंचवटे, बदावत , खोबरे यांनी सहकार्य केले .