पृथ्वीला वाचवण्यात येणाऱ्या नासाच्या DART मिशनला मोठं यश

नासाने आणखी एक मोठे यश आपल्या नावावर केले आहे. त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट डार्ट मिशन यशस्वी ठरला आहे. पृथ्वीला वाचवण्याच्या उद्देशाने लघुग्रहावर धडकण्यासाठी निघालेल्या डार्ट मोहिमेला यश आले आहे. ही टक्कर तर झालीच पण यामुळे ऑर्बिटची दिशाही बदलली आहे.

डार्ट मिशन बद्दल मी माझ्या मागच्या २६ सप्टेंबर २०२२ च्या लेखामध्ये संपूर्ण माहिती लिहिलेली आहे. काही दिवसांपूर्वी नासाने, दुहेरी लघुग्रह पुनर्निर्देशन चाचणी (Double Asteroid Redirection Test – DART) मोहिमेचे अंतराळ यान डिडिमोस (Didymos) लघुग्रहाभोवती फिरणाऱ्या डीमोर्फोस (Dimorphos) या छोट्या लघुग्रहाशी धडकले. नासाने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, या टक्करमुळे हा लघुग्रह दुसऱ्या कक्षेत ढकलला गेला आहे.जारी केलेल्या निवेदनात नासाने म्हटले आहे की, डार्टने लघुग्रहाचा मार्ग यशस्वीपणे बदलला आहे. आता तो दुसऱ्या कक्षेकडे निघाला आहे. हे नासाचे एक महत्त्वाकांक्षी मिशन होते. इतकंच नाहीतर मानवतेसाठी हा एक ऐतिहासिक क्षण म्हणून ओळखला जाईल.

मिशन डार्ट (Mission DART) अंतराळ यानाची लांबी १९ मीटर होती. म्हणजे साधारण बसपेक्षा पाच मीटर जास्त. डिमॉर्फोस या लहान लघुग्रहाशी ज्या अंतराळ यानाची टक्कर झाली, तो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या उंचीपेक्षा जवळपास १९ मीटरने लहान आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची १८२ मीटर आहे. तर डिमॉर्फोस १६३ मीटर आहे. म्हणजेच दीड फुटबॉल मैदानाच्या लांबीएवढी.

डार्ट मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांसमोरील सर्वात मोठे आव्हान होते ते लाखो किलोमीटर अंतरावर असलेल्या डिमॉर्फोस या छोट्या लघुग्रहाला अंतराळयानाने अचूकपणे टक्कर मारणे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, नासाने अंतराळ यानाच्या पुढील बाजूस DRACO कॅमेरा बसवला. त्यात स्वयंचलित नेव्हिगेशन प्रणाली SMART NAV होती. जी पृथ्वीवर बसलेल्या अभियंत्यांना दिशा आणि वेग बदलण्यात मदत करत होती.

तत्काळ दिशादर्शक यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ती त्या बाजूला वळवण्यात आली. आता तो लघुग्रह त्याच्या जागेवरून किती हलला हे त्या वेळी स्पष्ट झाले नव्हते. पण आता आलेले निकाल नासासाठी चांगले आहेत. कारण फक्त टक्कर झाली नाही तर लघुग्रहाची दिशाही बदलली गेली आहे.

या यशस्वी प्रयोगामुळे भविष्यात जर एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येणार असेल तर त्याची दिशा बदलविण्यास मदत होईल व पर्यायाने पृथ्वीला व पृथ्वीवरील जीवसृष्टीला वाचविण्यास मदत होईल.

माहिती संकलन:

प्रा. हेमंतकुमार भिमराव मेश्राम

भौतिकशास्त्र विभाग प्रमुख

श्री ज्ञानेश् महाविद्यालय नवरगाव

ता. सिंदेवाहि जिल्हा. चंद्रपूर

Source: Maharashtratimes.com, 12 October 2022 at 8.00 am

Reach us @

Shri Dnyanesh Mahavidyalaya, Nawargaon,

Chimur Road, Sub-Distt – Sindewahi, Distt – Chandrapur, PIN – 441223 (M. S.)

Locate us

Our contacts

Office Hours

Monday to Friday

10:00 am – 05:00 pm

Saturday

07:30 am – 11:30 pm