राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. बीए, बीएस.सीच्या सहा विद्यार्थ्यांनी यावेळी
अभिवादनपर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमातून एक गोष्ट लक्षात आली की नव्या पिढीचे विद्यार्थी काहीतरी वेगळा विचार करीत आहे. त्यांच्याही मनात समकालीन काही विसंगतीबद्दल व विविध महापुरुषांबद्दल असणाऱ्या पूर्वग्रहाबद्दल जाणीव विकसित आहे. पूर्वा झोडे,साक्षी ठीकरे आणि रुपाली डोंगरावर या विद्यार्थिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनपर मनोगतात आत्मटिका करीत अभ्यास आणि चिंतनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. रोहित झोडे या विद्यार्थ्यांने विद्यार्थ्यांनी पुस्तके खरेदी केली पाहिजे हे या निमित्ताने सुचविले.
मुख्य मार्गदर्शनात डॉ. इंदुरकर यांनी विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कसे अभिवादन करावे? या संदर्भात एककृती कार्यक्रम दिला दिवसाला रोज सहा तास अभ्यास किला तरीही बाबासाहेब आंबेडकरांना ही खरी श्रद्धांजली ठरेल असे ते म्हणाले. आपण महापुरुषांचं साहित्य वाचावं आणि त्यांना समजून घ्यावं. समाज माध्यमांवरील कुठल्याही बनावट संदेशाला अंतिम समजून खोट्या प्रचाराला बळी पडू नये असे अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ सुरेश बाकरे यांनी विद्यार्थ्यांना सुचविले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.ललित उजेडे आणि सहकारी प्राध्यापक उपस्थित होते. बीए तृतीय वर्षाचे विद्यार्थी कार्तिक ठाकरे याने संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर सुरज देशमुख यांने आभार मानले.