महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या सौजन्याने myemotionalfirstaid.org या वेबसाईट संदर्भातील ऑनलाईन मीटिंग संदर्भात. गोंडवाना विद्यापीठाचे पत्र क्रमांक GU/DSW/395/ 2023 दिनांक 01/01/2023 या अनुषंगाने आमच्या श्री ज्ञानेश महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. गजानन कोरतलवार, उपप्राचार्य डॉ ललित उजेडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.आस्तिक मुंगमोडे, ऑफिस सुप्रीडेंट होमेश काशिवार, लायब्ररीयन दिनेश काथोटे, इतिहास विभागाचे प्रमुख विजय वाकोडे, इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक दुर्गेश क्षीरसागर, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.हेमंत मेश्राम, गणित विभागाचे प्रमुख प्रा.अंकोश रामटेके, शिक्षकेतर कर्मचारी जय बदावत, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी बीए तृतीय वर्षाचा सुजित बोरकर, बीएससी प्रथम वर्षाची कुमारी पूर्वा झोडे हे सर्व लोक कॉन्फरन्स हॉलमध्ये ऑनलाईन मीटिंगची जोडल्या गेले होते. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात विविध प्रश्नांवर साधक बाधक चर्चा या मीटिंगमधून करण्यात आली. MFSD च्या वतीने शिक्षण व्यवस्थेतील सर्व घटकांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात अत्यंत समर्पक अशा वेबसाईटचे परिचय करून देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विविध व्हाट्सअप ग्रुप वर प्रस्तुत वेबसाईटची लिंक पाठवण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात विविध उपक्रम राबविण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्दिष्टे
1. गोंडवाना विद्यापीठ तसेच शासनाच्या निर्देशाचे पालन.
2. शिक्षण व्यवस्थेतील सर्व घटकांच्या मानसिक आरोग्य संदर्भात जनजागृती.
3. मानसिक आरोग्याच्या संदर्भात वेबसाईटची ओळख करून घेणे.
कार्यक्रमाचे फलित.
1. मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे सर्वांना समजले.
2. महाविद्यालयात नाही म्हटले तरी ताणतणाव असतोच त्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन झाले.
3.पौगंड अवस्थेतील विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यांचे मानसिक आरोग्य या संदर्भात वेबसाईटचे अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले.