क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीच्या निमित्ताने “क्रांतीज्योती सावित्रीबीची आजही समाजाला गरज आहे.” या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.उमेश इंदुरकर व मराठी विभाग प्रमुख डॉ.गजानन कोर्तलवार यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.या स्पर्धेत कला व विज्ञान शाखेतील एकून 6 स्वयंसेवक भाग घेतले.या स्पर्धेत बी.ए.II वर्षाची जोत्स्ना मांदाळे ही प्रथम तर बी.एससी II वर्षाचा राजन लांजेवार हा दुसरा तर बी.ए प्रथम वर्षाची करिष्मा बारसागडे ही तिसरी आली. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना ग्रंथ रुपात बक्षिसे देण्यात आली.