मराठी विभागाच्या वतीने आयोजित अभ्यागत व्याख्यान यात कविता आणि कादंबरी निर्मितीप्रक्रिया समजून घेण्यासठी प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. तसेच साहित्य मंडळाचे गठन करून साहित्याच्या विद्यार्थ्यामध्ये वाचनाची गोडी लागावी असा हेतू ठेऊन या कार्यक्रमात एक लेखक आणि एक साहित्याचा अभ्यासक असे वक्ते निवडले. लेखक म्हणून पवन भगत तर साहित्याचे अभ्यासक डॉ महेबूब सय्यद यांना निमंत्रित केले. आपल्या भाषणात बोलताना महेबूब सय्यद म्हणाले. “मराठी कवितेत भाकरीचा चंद्र शोधणारी शब्दकळा नारायण सुर्वे आणतात, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे जीवन कवितेचा विषय बनवतात. मानवी जीवनाकडे पाण्याचा उन्नत दृष्टिकोन नारायण सुर्वे यांची कविता निर्माण करते. कारण ती जीवनाच्या अस्सल अशा अनुभवातून निर्माण झालेली कविता आहे. सुर्वेंची जीवननिष्ठा ही अस्सल आहे. समाज आणि धर्माकडे पाहण्याचा त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन हा अत्यंत परिपक्व आहे. म्हणून त्यांची कविता अत्यंत उंचीची कविता आहे हे मान्य करावे लागेल.” असे प्रतिपादन अहिल्यानगर येथील मराठीसाहित्याचे अभ्यासक डॉ महेबुब सय्यद यांनी केले. श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने अभ्यास मंडळाचे उद्घाटन साहित्यावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कादंबरीकार पवन भगत यांनी ‘ते पन्नास दिवस : कादंबरी निर्मितीची प्रेरणा’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते बोलताना म्हणाले “मी दहावी नापास आहे. माझे फार शिक्षण झाले नाही. पण आपल्या भोवतालाकडे, मानवी जीवनाकडे मी डोळसपणे पाहतो. कोरोना काळात रस्त्यावर आलेली मजुरांची तांडे काय जीवन जगत होती? सिमेंटच्या जंगलातील मनसे एकमेकापासून दूर जाताना शहरातून पाई पाई निघालेल्या माणसांच्या गर्दीला खऱ्याखोऱ्या जंगलांनी आधार दिला. जंगलातील फळफुल, मध, पाणी आणि वाळलेल्या लाकडांचा आधार घेत उघड्या माळराणी संसाराचा काबीला ओढत हे मजूर आपल्या गावाकडे निघाले होते. त्यांची जितीजागती कथा, जे डोळ्यांनी पाहिले, अनुभवले ते कादंबरीत मांडले. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणापेक्षा आजूबाजूला डोळसपणे पहा, माणसाचे जीवन समजून घ्या, त्यांचे दुःख जाणून घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मराठी साहित्याच्या सर्व विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अमृत लंजे हे होते. कार्यक्रमाच्या आयोजना मागची पार्श्वभूमी व्यक्त करून पाहुण्यांचा परिचय डॉ गजानन कोर्तलवार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद सहारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु. साक्षी करकाडे या विद्यार्थिनीने मानले. यावेळेस मराठी अभ्यास मंडळाच्या कार्यकारणीतील विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.