राष्ट्रीय सेवा योजना श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगावच्या वतीने दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने युवा दिनाचे औचित्य साधून “स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील युवक”या विषयावर प्रा. वैभव मस्के यांचे व्याख्यान घेण्यात आले. त्यांनी आपल्या व्याख्यानात विवेकानंदाच्या एकूण चरित्राचा वेध घेत विवेकानंदन यांना अपेक्षित असणाऱ्या युवकाचे स्वरूप विश्लेषण केले. प्रखर बुद्धीवादी, बलशाली, विवेकी, चरित्रवान, सृजनशील देशभक्त युवकांचे सप्न स्वामी विवेकानंद यांनी पाहिलेली दिसते. या देशातील दारिद्र्य विषयी अस्वस्थ होत युवकांची जबाबदारी काय आहे? हे विविध पत्रात विवेकानंदांनी स्पष्ट केलेले प्रा मस्के यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. उत्कृष्ट असे व्याख्यान देत संपूर्ण सभागृहातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाचे त्यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे हे होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.सुनील कुंभारे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.गजानन कोर्तलवार यांनी आभार मानले.कु. सिद्धी
मेंधुलकर या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे संचालन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे 75 स्वयंसेवक उपस्थित होते.