Abhijat Marathi Gourv Week – Lecture

Friday, October 9th, 2026, 2:00 pm - Friday, October 9th, 2026, 4:00 pm

Organizers : Department of Marathi | Venue : Psaydan Hall | Attendance : 300

Objectives of Activity

1.अभिजात मराठी भाषेचा प्रवास समजून घेणे.

2.मराठी भाषेतील साहित्य परंपरा यांची ओळख करून देणे.

2.कृत्रिमबुद्धिमत्ता आणि भाषाशिक्षण यातील आव्हाने समजून घेणे.

3.मराठी भाषा आणि तंत्रज्ञान यातील नाते समजून घेणे.

Glimpses

Complete Story

मराठी विभागाच्या वतीने – सेवा संकल्प सप्ताह तथा अभिजात मराठी भाषा गौरव सप्ताहाचे आयोजन.

नवरगाव –

” आज जगभर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने मानवी कल्याणाचे उपक्रम राबविले जात आहे. वैद्यकीय क्षेत्र, न्यायालय, मोटार निर्मिती, सॉफ्टवेअर, शिक्षण सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अत्यंत वेगाने काम करणारे तंत्रज्ञान म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेकडे पाहिले जात आहे. पण मित्रांनो हे सर्व मानवी हिताचे असले तरी अनेक क्षेत्रातल्या कायम रोजगारावर असणाऱ्या माणसांना हे तंत्रज्ञान बेरोजगार करीत आहे. काळाच्या दृष्टीने शिक्षणातील नवे पर्याय भारतात कोणकोणते आहेत हे शोधत सध्याची व्यवस्था आपण समजून घेतली पाहिजे. मानव्य विद्याशाखा आणि मूलभूत विज्ञानाच्या अभ्यासातून विविध क्षेत्रातील संधी शोधत नव्या तंत्रज्ञानाशी ओळख होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वसामान्यांच्या लेकरांसाठी सरकारी शिक्षणाची प्राथमिक ते उच्च शिक्षणाची दारे सताड उघडी हवी. ती बंद होता कामा नये. शाळा बंद केली जाणे हे कुणालाही परवडणारे नाही. शेवटी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कितीही कठीण प्रसंग आला तरीही पारंपारिक जीवनाचा स्त्रोत म्हणून शेतीकडे सकारात्मक पाहणे गरजेचे आहे.अडचण आहे म्हणून शेती कधीच विकू नका” असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक मिलिंद कीर्ती यांनी केले. निमित्त होते
सेवा सप्ताह संकल्प आणि अभिजात मराठी भाषा गौरव सप्ताह निमित्ताने विशेष व्याख्यानाचे. श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ” तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता सहमतीची हुकूमशाही खंड एक आणि दोन” अशा बहुचर्चित ग्रंथाचे लेखक विचारवंत मिलिंद कीर्ती यांनी सलग दीड तास विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. प्रस्तुत व्याख्यानाच्या आयोजनामाची पार्श्वभूमी विशद करत पाहुण्यांचा परिचय डॉ गजानन कोर्तलवार यांनी करून दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आस्तिक मुंगमोडे हे होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. गीता पर्वते यांनी मानले. प्रा. ज्ञानीदास गहाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Outcomes / Outputs of Activity

 

1.अभिजात मराठी भाषेचा प्रवास उलगडून दाखविण्यात आला.

2.मराठी भाषेतील साहित्य परंपरा यांची ओळख करून देण्यात आली.

2.कृत्रिमबुद्धिमत्ता आणि भाषाशिक्षण यातील आव्हाने यावर दीर्घ चर्चा झाली.

3.मराठी भाषा आणि तंत्रज्ञान यातील नाते समजून घेण्यात प्रस्तुत व्याख्यान उपयोगी झाले.

 

Reach us @

Shri Dnyanesh Mahavidyalaya, Nawargaon,

Chimur Road, Sub-Distt – Sindewahi, Distt – Chandrapur, PIN – 441223 (M. S.)

Locate us

Our contacts

Office Hours

Monday to Friday

10:00 am – 05:00 pm

Saturday

07:30 am – 11:30 pm