BOOK PUBLICATION

Saturday, July 18th, 2026, 11:00 am - Saturday, July 18th, 2026, 12:00 am

Organizers : DEPARTMENT OF MARATHI | Venue : Pasaydan Hall Shree Dnyanesh Mahavidylay Nvargav | Attendance : 300

Objectives of Activity

1.मराठी नाटक प्रकाशित करणे.

2.लेखकांची निर्मिती प्रक्रिया समजून घेणे

3.विद्यर्थ्यांना लेखन विषयक प्रेरणा देणे

4.समाज व महाविद्यालय सेतू निर्माण करणे

Glimpses

Complete Story

श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या मराठी भाषा विभाग आयोजित व स्तंभ पब्लिशिंग हाऊस प्रकाशित लेखक सदानंद बोरकर लिखित ‘दोन घराचं गाव’ या नाट्य पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच नवरगाव येथे पार पडले, यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी भाष्यकार म्हणून प्रसिद्ध समीक्षक व साहित्य अकादमीचे डॉ.प्रमोद मुनघाटे तर अतिथी म्हणून नाट्य आस्वादक जयंत बोरकर, गीतकार युवराज गोंगले, प्रकाशक अविनाश पोईनकर, प्राचार्य डॉ.अमृत लंजे उपस्थित होते.

सदानंद बोरकर हे नाव झाडीपट्टी रंगभूमीचे लौकिक आहे. समाजाला अंतर्मुख करून प्रबोधनाची नवी वाट दाखवणाऱ्या नाटकांची त्यांनी निर्मिती केली. ‘दोन घराचं गाव’ हे नाटक पुनर्वसनात उध्वस्त झालेल्या परिवाराची वाताहत दाखवते. झाडीबोलीतील भाषा आणि थेट रसिक-वाचकांना विचार प्रवृत्त करायला भाग पाडणारे त्यांचे हे नाटक सामाजिक प्रबोधनाची नांदी आहे, असे असे मत प्रसिद्ध समीक्षक व साहित्य अकादमीचे सदस्य डॉ.प्रमोद मुनघाटे यांनी प्रमुख भाष्यकार म्हणून व्यक्त केले.

स्तंभ पब्लिशिंग हाऊस चे प्रकाशक अविनाश पोईनकर यांनी प्रास्ताविकातून प्रकाशन व पुस्तक निर्मितीची भूमिका मांडली. लेखक व नाटककार सदानंद बोरकर यांनी नाट्यनिर्मितीमागील प्रेरणा सांगताना, हे नाटक लिहिण्याचा उद्देश केवळ साहित्यनिर्मिती नाही, तर समाजातील वास्तवाला कलात्मक रूप देणे आहे. रंगभूमी ही केवळ समाजाचा आरसा नसून समाजाला स्वतःचा चेहरा दाखवणारी सजग जाणीव असल्याचे मत व्यक्त केले. भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंतराव बोरकर यांनी नाट्य आस्वादक म्हणून विचार मांडले. नाटकासाठी गीत व संगीत देणारे युवराज गोंगले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ.गजानन कोर्तलवार यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ.अमृत लंजे यांनी मानले. यावेळी नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर साहित्य रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Outcomes / Outputs of Activity

  1. बहुसंख्य विद्यार्थी व निमंत्रित बांधव या कार्यक्रमात उपस्थित होते.
  2. मराठी विभागाच्या वतीने पहिल्यांदाच पुस्तक प्रकाशन सोहळा घेण्यात आला.
  3. नाट्यनिर्मिती या विषयावर   व्याख्यान देण्यात आले.
  4. स्तंभ प्रकाशनचा पुस्तक स्टाल लागल्याने अनेकांना पुस्तके खरेदी करता आली.

Reach us @

Shri Dnyanesh Mahavidyalaya, Nawargaon,

Chimur Road, Sub-Distt – Sindewahi, Distt – Chandrapur, PIN – 441223 (M. S.)

Locate us

Our contacts

Office Hours

Monday to Friday

10:00 am – 05:00 pm

Saturday

07:30 am – 11:30 pm