श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक 05 जून 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सत्र 2022-23 मध्ये केलेल्या वृक्षारोपणाच्या स्थळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातील शंभर झाडांच्या भोवती आळे केले. झाडांच्या भोवती वाढलेले गवत काढून वाऱ्या वादळाने वाकलेल्या झाडांना बांबूचा आधार देऊन बांधणे, झाडांना पाणी देणे, अशी काही कामे केली. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिरामध्ये दि. 2 जानेवारी 2023 रोजी दत्तक गाव मिनघरी येथील स्मशानभूमीमध्ये लावलेल्या 80 झाडांना पाणी देऊन देखरेख करण्यात आले. तिथे लावलेल्या सर्व झाडांचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य विनीत दहिवले तसेच त्यांच्या आमचे गाव आमचा विकास या मंडळातील सभासदांची चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करून नव्हे तर वृक्ष संवर्धन करूनच पर्यावरणाचे रक्षण करण्यात येते हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. गजानन कोर्तलवार, सह कार्यक्रमाधिकारी प्रा. हेमंत मेश्राम तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे 12 स्वयंसेवक उपस्थित होते.