LEKHAN PRERNA DIVAS

Saturday, August 1st, 2026, 10:00 am - Saturday, August 1st, 2026, 12:00 am

Organizers : DEPARTMENT OF MARATHI | Venue : PASAYDAN HALL | Attendance : 80

Objectives of Activity

1. विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा परिचय करून देणे.
2. शासन निर्देशाचे पालन करणे.
3. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील व्यक्तिचित्रांचा परिचय करून देणे.
4. सृजनशील लेखकांचा परिचय करून देणे.
5. विद्यार्थ्यांमध्ये लेखनासाठी प्रेरणां निर्माण होईल असा कार्यक्रम आयोजित करणे.

Glimpses

Complete Story

महाराष्ट्र शासन तथा उच्च शिक्षण सहसंचालक नागपूर आपले पत्र क्रमांक 3515908 दिनांक 31/07/2026 अण्णाभाऊ साठे जयंतीच्या संदर्भात महाविद्यालयात उपक्रम राबवण्याचे निर्देश प्राप्त झाले. महाविद्यालयातील मराठी विभाग यांच्यावतीने लेखन प्रेरणा दिवसाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून झाडीपट्टीतील नाट्य कलावंत माननीय सदानंद बोरकर तथा चंद्रपूर येथील प्रसिद्ध कवी अविनाश पोईनकर यांना निमंत्रित करण्यात आले. दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी ठीक अकरा वाजता महाविद्यालयाच्या पसायदान सभागृहात विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर एक अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने अविनाश पोईंनकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील लढाऊ तसेच शूर व्यक्तिचित्रांचा परिचय करून दिला. त्यांच्या साहित्य मागील प्रेरणा सांगून अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबऱ्यांच्या स्वरूपाची चिकित्सा केली. माननीय सदानंद बोरकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील सामाजिकता या विषयाचा उहापोह करीत स्वतःच्या नाट्यलेखना संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रस्तुत कार्यक्रमातून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा परिचय झाला. लेखक म्हणून, शाहीर म्हणून तसेच अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक थोर कार्यकर्ते म्हणून काय योगदान दिलेले आहे हे विद्यार्थ्यांना या निमित्ताने सांगण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमृत लंजे हे अध्यक्ष होते. कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय तथा कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका मराठी विभागाचे प्रमुख डॉ गजानन कोतलवार यांनी विशद केली. प्रस्तुत कार्यक्रमात गावातील काही निमंत्रित बांधव तसेच महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Outcomes / Outputs of Activity

1. बहुसंख्य विद्यार्थी प्रस्तुत कार्यक्रमात सहभागी झाले.
2. विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
3. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला.
4. लेखन प्रेरणा या अंगाने विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले.

Downloads

Reach us @

Shri Dnyanesh Mahavidyalaya, Nawargaon,

Chimur Road, Sub-Distt – Sindewahi, Distt – Chandrapur, PIN – 441223 (M. S.)

Locate us

Our contacts

Office Hours

Monday to Friday

10:00 am – 05:00 pm

Saturday

07:30 am – 11:30 pm