श्री ज्ञानेश महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सत्र २०२३- २४ चे विशेष वार्षिक शिबीर मागील वर्षी प्रमाणे दत्तक गाव मिनघरी ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर येथे आयोजन करण्यात आले. “समृद्ध भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका” या मध्यवर्ती विषयाला प्रमाण ठेऊन भारतच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे स्मरण करून गोंडवाना विद्यापीठ तसेच शासनाकडून प्राप्त निर्देशाचे पालन करून दत्तक गाव मिनघरी येथे दि. 10 डिसेंबर 2023 ते 16 डिसेंबर 2023 या दरम्यान शिबीर पार पडले.या शिबिरात एकूण 50 स्वयंसेवक सहभागी झाले होते. या वर्षी विद्यापीठ आपल्या गावात गोंडवाना विद्यापीठाचा हा विशेष सर्वे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विविध नागरिकांच्या मुलाखती घेऊन राबविला. या शिबिरात श्रमदान.बौद्धिक तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमात नवीन प्रयोग करण्यात आले.
विशेष वार्षिक शिबिराच्या आयोजना मागील उद्दिष्टे –
1.राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना गावाशी जोडणे.
2.गोंडवाना विद्यापीठाच्या निर्देशाप्रमाणे ” विद्यापीठ आपल्या गावात” हा सर्वे करणे.
3.गावातील प्रश्न समजून ते सोडविण्यासाठी स्वयंसेवकाच्या मदतीने प्रयत्न करणे.
4.गावात ग्रामस्वच्छता राबविणे, वृक्षारोपण करणे आणि गावात जनजागृती करणे.
5.स्वयंसेवकांच्या व्य्क्तीमत्वाला आकार देणे.
या सात दिवसीय विशेष वार्षिक शिबिरात खालील दैनंदिनी पाळण्यात आले आहे.
रविवार दि. 10 डिसेंबर 2023 रोजी
जि.प.शाळा मिनघरी येथे शिबीरस्थळी सर्व स्वयंसेवकाचे १२ वाजे पर्यंत आगमन.
१२ ते २ परिसर स्वच्छता.
२ ते ३ जेवण.
३ ते ४ निवास व्यवस्था.
४ ते ५ स्टेज आणि बैठकव्यवस्था.
५ ते ६ स्वयंपाक व्यवस्था.
६ ते ७ कार्यनियोजन.
७ ते ८ जेवण
८ ते १० संस्कृतिक कार्यक्रम
१० वाजता/ दिनसमाप्त
सोमवार दि.११/१२/२०२३ रोजी
पहाटे ५ ते ६ जागर
६ ते ७.३० स्फूर्तीगीत,प्रर्थनाम, व्यायाम,योगाभास,वचनसंकल्प
७.३० ते ८ अल्पोपहार व चहा
८.०० ते १०.३० ग्रामस्वच्छता
१०.३० ते १२ उद्घाटनसोहळा तयारी
१२ ते १.३० उद्घाटन उद्घाटक -डॉ.चन्द्रशेखर चांदेकर,प्रमुख अतिथी डॉ.संजय शेंडे,सरपंच शुभांगीताई अत्राम, अध्यक्ष मा.डॉ सुरेश बाकरे
१.३० ते २.३० जेवण
३ ते ५ बौद्धिक सत्र
1.चला माणूस होऊया -डॉ संजय शेंडे
2.स्वयंपूर्ण गावाच्या निर्मितीत युवकांची भूमिका – डॉ.चंद्रशेखर चांदेकर
५ ते ६ गटचर्चा
६ ते ७ .३० आढावा बैठक
७.३० ते ८.३० भोजन
८.३० ते १० सांस्कृतिक कार्यक्रम – गीतगायन व जनजागृती
रात्री १० दिनसमाप्त
मंगळवार दि.१२/१२/२०२३ रोजी
पहाटे ५ ते ६ जागर
६ ते ७.३० स्फूर्तीगीत,प्रर्थनाम, व्यायाम,योगाभास,वचनसंकल्प
७.३० ते ८ अल्पोपहार व चहा
८.३० ते ११.३० मिनघरी स्मशानभूमीत मागील वर्षी लावलेल्या ७२ झाडांना आळे करणे व पाणी देणे.
१०.३० ते १२ उद्घाटनसोहळा तयारी
१२ ते १.३० उद्घाटन
१.३० ते २.३० जेवण
३ ते ५ बौद्धिक सत्र
1.सायबर गुन्हे आणि समाजमाध्यमांचा विवेकी वापर
वक्ते – पोलीस निरीक्षक रोषण अंजना इरपाते, कम्युनीटी सेल चंद्रपूर
५ ते ६ गृहभेटी
६ ते ७ .३० आढावा बैठक
७.३० ते ८.३० भोजन
८.३० ते १० सांस्कृतिक कार्यक्रम – प्रहसन सादर करून जागृती
रात्री १० दिनसमाप्त
बुधवार, दि.१३/१२/२०२३ रोजी
पहाटे ५ ते ६ जागर
६ ते ७.३० स्फूर्तीगीत,प्रर्थनाम, व्यायाम,योगाभास,वचनसंकल्प
७.३० ते ८ अल्पोपहार व चहा
८.३० ते ११.३० मिनघरी स्मशानभूमीत वृक्षरोपण तयारी व ३९ खड्डे तयार करणे. मिनघरी स्मशानभूमीत ३९ रोपट्यांचे वृक्षरोपण फणस, आंबा, पेरू या फळ झाडांची लागवड तसेच सर्व १११ झाडांना पाणी टाकणे.
१२.३० ते २.३० भोजन विश्रांती
२.३० ते ४.३० बौद्धिक सत्र
1.लोकशाही आणि युवक – प्रा.आकाश मेश्राम, ब्रम्हपुरी
2.साहित्य वाचनाने माणूस घडतो – डॉ मिलिंद पठाडे, ब्रम्हपुरी
५ ते ६ विद्यापीठ आपल्या गावात सर्वे
६ ते ७ .३० आढावा बैठक
७.३० ते ८.३० भोजन – ८.३० ते १० मनुष्य वन्यजीव संघर्ष – मा.यश कायरकर, पर्यावरन अभ्यासक
रात्री १० दिनसमाप्त
गुरुवार, दि.१४/१२/२०२३ रोजी
पहाटे ५ ते ६ जागर
६ ते ७.३० स्फूर्तीगीत,प्रर्थनाम, व्यायाम,योगाभास,वचनसंकल्प
७.३० ते ८ अल्पोपहार व चहा
८.३० ते ११.३० मिनघरी गावातील संपूर्ण रस्ते,नाल्या,अंगणवाडी,शाळा परिसर स्वच्छता करणे.
११.३० ते १२.३० स्नान
१२.३० ते २.३० भोजन आणि विश्रांती
१.३० ते २.३० जेवण
२.३० ते ४.३० बौद्धिक सत्र
1.पर्यावरण आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न- मा.विलासभाऊ भोंगाडे, नागपूर
2.सर्वजनिक आरोग्याचा प्रश्न आणि कष्टकरी समुदाय – मा.डॉ.हरीश धूरट, नागपूर
५ ते ६ चला गाव जाणून घेऊया – गावातील समस्या व अडचणींचा सर्वे
६ ते ७ .३० आढावा बैठक
७.३० ते ८.३० भोजन (माळी समुदायाच्या वतीने स्वयंसेवकांना निमंत्रण)
८.३० ते १० पथनाट्य व लोकनृत्य सादरीकरन
रात्री १० दिनसमाप्त
शुक्रवार दि.१५/१२/२०२३ रोजी
पहाटे ५ ते ६ जागर
६ ते ७.३० स्फूर्तीगीत,प्रर्थनाम, व्यायाम,योगाभास,वचनसंकल्प
७.३० ते ८ अल्पोपहार व चहा
८.00 ते ९.०० स्नान
९.०० ते १०.३० – मिनघरी गावातून अंधश्रध्दा, व्यसनमुक्ती, स्त्रीपुरूष समता या विषयावर घोषणा देऊन प्रबोधनपर संदेश देत रँली तसेच काही चौकात तीन पथनाट्य करून जनजागृती.
१०.३० ते १२.०० समारोपीय कार्यक्रमची तयारी
१२.०० ते १.३० समारोपीय सोहळा तसेच NSS सप्ताहातील विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षीस वितरण.
१.३० ते ३.०० भोजन
३.०० ते ५.०० शाळा परिसर स्वच्छता,श्रमदान साहित्य मोजणे,सर्व सामानाची जुळवणी आणि बांधणी
५ ते ७.३० संपूर्ण शिबिराचा आढावा
७.३० ते ८.३० भोजन
८.३० ते १० सांस्कृतिक कार्यक्रम
रात्री १० दिनसमाप्त
शनिवार दि.१६/१२/२०२३ रोजी
पहाटे ५ ते ६ जागर
६ ते ७.३० स्फूर्तीगीत,प्रर्थनाम, व्यायाम,योगाभास,वचनसंकल्प
७.३० ते ८ अल्पोपहार व चहा
८.ते १० स्वयंपाक भांडे पोहचविणे
१० ते ११.०० शिबीर स्थळावरून प्रस्थान
११.०० ते २ .०० विद्यार्थीनी स्वयंसेवक यांना नवरगावला तसेच ज्यांच्या त्यांच्या गावासाठी बसस्थानकावर सोडणे
२.०० ते ४ श्रमदानाचे साहित्य महाविद्यालयात पोहचविणे.
शिबीर समाप्त
कार्यक्रमाधिकारी प्राचार्य
श्री ज्ञानेश महाविद्यालय,नवरगाव
राष्ट्रीय सेवा योजना
श्री ज्ञानेश महाविद्यालय,नवरगाव