साने गुरुजी जयंतीच्या निमित्ताने साने गुरुजींच्या साहित्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा या हेतूने मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि समीक्षक माननीय सुशील धसकटे यांचे व्याख्यान घेण्यात आले. माननीय सुशील धसकटे यांनी साने गुरुजी यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा आणि साहित्याचा विस्तृत परिचय करून दिला. आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान अशा स्फूर्ती गीतांचा स्वातंत्र्य चळवळीत आणि आजही किती महत्त्व आहे हे सांगितले. साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वातील माणूसपणा अत्यंत ठळकपणे त्यांनी समजावून सांगितला. कृतीउक्तित अंतर नसणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे साने गुरुजींच्या एकूणच आचरणात किती महत्त्व दिसून येते हेही समजावून सांगितले. प्रस्तुत कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील काही विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राणीशास्त्र विभागाचे इंदुरकर तसेच इंग्रजीचे प्रा क्षीरसागर हेही विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन उपस्थित होते. गुगल मीटवर हे मीटिंग घेण्यात आली. एकूण 30 लोक सहभागी होते.पाहुण्यांचा परिचय आणि कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका मराठी विभागाचे प्रमुख डॉ गजानन कोरतलवार यांनी विशद केले.