जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख असलेल्या भारत देशात लोकशाहीचे प्रथम कर्तव्य म्हणून मतदान करणाऱ्यांची संख्या कमी होणे ही चिंतनीय बाब आहे. यादृष्टीने राष्ट्रीय स्तरावर विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दर वर्षी “राष्ट्रीय मतदाता दिन” 25 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. आज राष्ट्रीय मतदाता दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना पथक तथा राज्यशास्त्र विभाग यांच्या विद्यमाने महाविद्यालयात आभासी पद्धतीने *राष्ट्रीय मतदाता दिन* साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाकरे सर उपस्थित होते व त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा विष्णू बोरकर यांनी केले. प्रा उजेडे यांनी मतदारांसाठी प्रतिज्ञा याचे वाचन करून सर्वांना सामूहिक प्रतिज्ञा दिली. रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ अरमरकर यांनी प्रयत्न केले. या आभासी कार्यक्रमात अनेक प्राध्यापकगण तथा विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.