श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने २८ फेब्रुवारी २०२४ रोजी विद्यापीठस्तरीय नाट्यतंत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गोंडवाना विद्यापीठ क्षेत्रातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये नाटक, अभिनय आणि संहिता लेखन यात रुची आहे. त्यांना योग्य दिशा देण्यासाठी नाट्यतंत्र कौशल्ये त्यांना शिकता यावे तसेच या विषयाची मुलभूत माहिती त्यांना मिळावी यासाठी मराठी विभागाचा हा कौशल्य विकासाचा उपक्रम होता.नवीन शिक्षण धोरणा प्रमाणे प्रत्येक क्षेत्रातील कौशल्ये विद्यार्थ्यांना शिकविणे आवश्यक आहे.याच हेतूने गोंडवाना विद्यापीठस्तरीय नाट्यतंत्र कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ.सतीश पावडे,वरिष्ठ सहायक प्राध्यापक,महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय,वर्धा तसेच मा.रमेश लखमापुरे नागपूर,मा.राजेश खाडे नागपूर हे उपस्थित होते.
उद्घाटन सत्रात जेष्ठ रंगकर्मी मा.सदानंद बोरकर हे अध्यक्ष होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश बाकरे हे प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होते.यावेळी श्री ज्ञानेश महाविद्यालयातील विद्यार्थी व चित्रकलेचे विद्यार्थी तसेच काही नाट्यकलावंत उपस्थित होते. तीन सत्रात पार पडलेली ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आणि महत्वपूर्ण राहिली.
खलील प्रमाणे विषय मांडणी व वक्ते होते.
1.विषय- नाट्यात्मक लेखनकलेचे तंत्र – डॉ.सतीश पावडे (नाटककार /दिग्दर्शक)वेळ – 11 ते 1
2.विषय-अभिनय आणि दिग्दर्शनाची तंत्रे श्री रमेश लखमापुरे (अभिनेता आणि दिग्दर्शक) वेळ 1.30 ते 3.30
3.विषय – प्रकाश योजना आणि स्पेशल इफेक्ट्-श्री राकेश खाडे (अभिनेता आणि तंत्र दिग्दर्शक) वेळ 3.30 ते 5.30
शेवटी प्रत्येक सहभगी कलावंत व विद्यार्थ्यांनी आपले कला प्रदर्शन केले.डॉ.गजानन कोर्तलवार यांनी समन्वयक म्हणून भूमिका पार पडली.सर्व सहभागी यांना प्रमाणपत्र बहाल केले गेले.