ट्रेन सुटली असती तर………..

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 74 विद्यार्थी व 10 शिक्षक असे 84 जन घेऊन महाविद्यालयाची सहल मी महाबळेश्वर महाड रायगड गणपतीपुळे व हरिहरेश्वर येथे घेऊन गेलो. महाबळेश्वर चा निसर्गरम्य परिसर, महाडचे चवदार तळे, गंधार पार्ले येथील बुद्ध लेण्या, तथा रायगड येथे 2167 पायऱ्या चढून छत्रपती शिवाजी महाराज यांचे राहण्याचे ठिकाण, राज्याभिषेक व समाधी स्थळ चढून डोळ्यात सामावून […]
माणूसपण पेरणारा दिवाळी अंक…

काळ अमुलाग्र बदलला तसं माणूसही. माणसाच्या जगण्या वागण्याच्या धारणाही बदलल्या. अनामिक भीती सर्वत्र भरून उरलेली. ” हल्ली माणुसकीच उरली नाही” “थोडी तरी माणुसकी ठेवा हो… “ “अरे,माणूस आहेस का जनावर?” “लहान बघत नाहीत, की मोठं बघत नाहीत, लोक हैवानसारखं वागतायत.” इत्यादी इत्यादी अशी सामान्य व्यक्तीपासून ते प्रतिष्ठित व्यक्तीपर्यंत बोलली जाणारी विधाने हल्ली नित्याचीच झाली आहेत. […]
वैराटचे जंगल अत्यंत अविस्मरणीय अनुभव…

वैराटचे जंगल अत्यंत अविस्मरणीय अनुभव… सातपुडा पर्वत रांगा एका आगळ्यावेगळ्या जंगलांनी व्यापलेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ज्या परिसरातून मी स्वतः येतो. ते जंगल पठारी स्वरूपाचे आहे. एका रेषेत पसरलेले हे जंगल आहे. वैराटचे सातपुडा पर्वतावरील हे जंगल असे पठारी नाही. खूप खालीवर, चढ उतार असणारे हे जंगल फार आगळे वेगळे आहे. बाराशे […]
अस्सल रानफुलांच्या मधाचा वास नाकातून भरा… तर चला मग चिखलदरा…

अस्सल रानफुलांच्या घट्ट मधांचे दोन-तीन थेंब जिभेवर पसरवल्यावर संपूर्ण आपले मुखेंद्रिय मधाळ होऊन जाते. आपली जीभ मधाशी एकात्म होते. या रान मधाचा अनुभव केवळ जीभच देते असे होत नाही. नाकाने या मधाचा अनुभव घेण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात नक्कीच गाविलगड किल्ल्याच्या परिसरात पायी पायी फिरले पाहिजे. हा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला चिखलदऱ्याला जावं […]
पृथ्वीला वाचवण्यात येणाऱ्या नासाच्या DART मिशनला मोठं यश

नासाने आणखी एक मोठे यश आपल्या नावावर केले आहे. त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट डार्ट मिशन यशस्वी ठरला आहे. पृथ्वीला वाचवण्याच्या उद्देशाने लघुग्रहावर धडकण्यासाठी निघालेल्या डार्ट मोहिमेला यश आले आहे. ही टक्कर तर झालीच पण यामुळे ऑर्बिटची दिशाही बदलली आहे. डार्ट मिशन बद्दल मी माझ्या मागच्या २६ सप्टेंबर २०२२ च्या लेखामध्ये संपूर्ण माहिती लिहिलेली आहे. काही दिवसांपूर्वी […]
अंतराळात सुरू आहे मोठा प्रयोग

अंतराळामध्ये वेगवेगळ्या खगोलीय घटना घडत असतात. त्या खगोलीय घटनांचा पृथ्वीवर चांगले आणि वाईट परिणाम होत असतात. अशा घटनांपैकी एक घटना म्हणजे लघुग्रह (Asteroid) पृथ्वीच्या कक्षे जवळून जाणे किंवा पृथ्वीवर येऊन आदळणे. लघुग्रह जर पृथ्वीवर येऊन आदळला आणि तो निर्जन ठिकाणी जर पडला तर नुकसान होणार नाही. पण मानव वस्तीच्या ठिकाणी पडला तर मानव जातीची मोठी […]
पृथ्वी नष्ट होणार!

काल परवाच्या न्यूज चॅनल मध्ये बातमी होती की सूर्यामध्ये पृथ्वी सामावून नष्ट होणार. परंतु प्रश्न निर्माण होतो, असं कां बरं होणार? सृष्टीचा नियम आहे की ज्याच्या जन्म झाला, त्याचा मृत्यू सुद्धा अटळ आहे. (ज्याची उत्पत्ती झाली तो नष्ट सुद्धा होणार.) फक्त एवढेच की कोणी अब्ज वर्ष जगणार तर कोणी काही मिनिटे, काही तास जगणार. उदाहरणादाखल […]